हिवाळ्यात घ्यायची काळजी

थंडी सुरु होतेय

  • सकाळच्या गार हवेत शक्यतो बाहेर पडू नका
  • तोंड धुणे, शौच विधी ,सकाळची पाण्यातील कामे यासाठी गरम पाणी वापरा
  • सकाळच्या वेळात पिण्यासाठी गरमच पाणी घ्या
  • डोकं, कान आणि कपाळ तसेच छाती यांची विशेष काळजी घ्या, गरम कपडे, स्कार्फ यांचा वापर करा
  • रोज आंघोळी पूर्वी अंगाला तिळाचे तेल कोमट करुन लावा तसेच आठवड्यातून किमान एक वेळा खोबरेल तेल कोमट करुन नाकात व कानात घाला
  • आहारात स्निग्ध पदार्थ वापरा, जसे की ती ,खोबरं, बदाम, खारीक ,तिळ इत्यादि. त्यासोबत गूळ, तूप यांचा वापर केल्याने थंडीत शरीरासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळते.
  • थंडीच्या दिवसात सकाळी अग्नी चांगला प्रदीप्त होतो व त्यामुळे लवकर भूक लागते म्हणून या दिवसात धुंधुर मास पाळण्याची पद्धत आहे जी शास्त्रीय आहे
  • हा आहार हलका फुलका नसून पौष्टिक व स्निग्ध पदार्थ वापरुन बनवलेला हवा म्हणूनच थंडीत सुका मेवा, उडीदडाळ, गहू ,डिंक, मेथ्या वापरून वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तयार केले जातात.
  • ही जास्त प्रमाणात मिळणारी ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जावी व वजन वाढू नये म्हणून भरपूर व्यायाम देखील करायला हवा.
  • सकाळी जॉगिंग, सायकलिंग, योगासने, सूर्य नमस्कार, प्राणायाम यासारखे विविधांगी व्यायाम आपले वय, वजन व शरीराची गरज बघून करावेत.
  • सर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, त्यासाठी आहारात आलं, लसूण, तुळस, गवती चहा, दालचिनी, मिरे या उष्ण पदार्थांचा गरजेनुसार वापर करावा
  • गरम पाण्यात निलगिरी तेलाचे थेंब टाकून वाफ घ्यावी
  • नाक चोंदल्या प्रमाणे वाटत असेल तर गॅसवर तवा गरम करून त्यावर ओवा, लसणाची साले, थोडं बाजरीचे पीठ घालून त्याची धुरी घ्यावी

वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( Ayurveda)