लग्न झालं, पहिली दोन तीन वर्षे सरली की ओढ लागते ती घरात पाळणा हलण्याची! घरचे ज्येष्ठ नागरिक तर तसा उघड उघड आग्रह धरु लागतातच पण स्वतः त्या जोडप्यालाही आपण आता आई बाबा व्हावं, आपलं कुटुंब पूर्ण व्हावं असं वाटायला लागतं. बरेच जण अगदी लकी असतात की ठरवलं की दोन चार महिन्यांत गर्भधारणा होते आणि पुढचा आनंदी प्रवास सुरु होतो. पण काही जणांना मात्र यासाठी खूपच वाट पहावी लागते .
आधी नैसर्गिक रित्या आज ना उद्या गर्भधारणा होईल म्हणून पुन्हा दोन तीन वर्षे वाट बघितली जाते. त्यानंतर मग डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. काही तपासण्या केल्या जातात. मग त्यात काय दोष आढळतो, स्त्री किंवा पुरुष कोणात दोष आहे त्यावर पुढच्या उपचारांची दिशा ठरते.
आयुर्वेद अशा प्रकारच्या समस्यांसाठी उत्तम उपचार देतो.
पूर्वी झालेल्या काही आजारांचा परिणाम म्हणून शुक्रनिर्मिती कमी अथवा अजिबात न होणे. स्थूलता, डायबेटीस इ. आजारांचा परिणाम म्हणून शुक्र निर्मिती तसेच समागम प्रक्रिया व्यवस्थित न होणे व्यसनांचा परिणाम म्हणून शुक्राणूंची निर्मिती बंद अथवा अगदी कमी होणे अशी अनेक लक्षणे पुरुष वंध्यत्वामध्ये आढळून येतात. यापैकी जे लक्षण असेल त्यानुसार कारणांचा मागोवा घ्यावा लागतो व पुढील उपचारांची दिशा ठरवावी लागते.
शुक्रजंतूंचे प्रमाण वाढवणे, त्यांच्यातील दोष नष्ट करणे यासाठी आयुर्वेदिक औषधे उत्तम प्रकारे काम करतात. काही विशिष्ट औषधे यासाठीच दिली जातात ज्यांना वाजीकर उपचार म्हटले जाते. रुग्णाच्या संपूर्ण तपासणी नंतर गरजेनुसार पंचकर्म उपचार करावे लागतात जे अत्यंत महत्त्वाचे असतात.
बस्ति हे पंचकर्म मात्र प्रत्येक रुग्णात करावेच लागते. कारण पुनरुत्पादन संस्थेच्या आजारात हे अतिशय आवश्यक कर्म आहे. यासाठी मात्रा बस्ति आधी दिले जातात. त्यासाठी वापरायची औषधे, तेले, काढे हे रुग्णाच्या गरजेनुसार ठरवले जातात. गरज वाटल्यास वृष्य बस्ति हा पुढील ऍडव्हान्स प्रकारचा बस्ती उपचार देखील करावा लागतो.
“आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल” या आमच्या अद्ययावत रुग्णालयात अनेक वर्षांच्या अनुभवावर तसेच अथक संशोधनावर आधारित हे सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. विशेषतः इतर पॅथीचे उपचार घेऊन थकलेले किंवा ज्यांना unexplained infertility असं लेबल लावलं गेलं आहे त्यांच्यासाठी हे उपचार खूपच उपयुक्त व अचूक परिणामकारक ठरतात.
अशा प्रकारच्या तक्रारींसाठी आजच संपर्क साधा.
वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)
संपर्क – 0253 2322100 , 91460 40531