कोरोनाची लागण होऊ नये ह्यासाठी काय करावे या अंतर्गत प्रतिबंधात्मक उपायांमध्ये गरम पाणी प्यावे हा एक उपाय भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेला आहे. ही पोस्ट लिहिण्यामागे दोन उद्देश आहेत एक म्हणजे यामागचे शास्त्रीय कारण समजावे आणि दुसरे म्हणजे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात हे कसे करावे याबद्दलच्या आपल्या मनातील शंकांचे निरसन व्हावे.
हा उपाय ऐकल्यावर अनेकांना असं वाटलं असेल की ज्या दिवसांत आम्ही फ्रीज मधील थंडगार पाण्याची बाटली डायरेक्ट तोंडाला लावतो त्या दिवसात हे कसले आम्हाला गरम पाणी प्यायला सांगताहेत. पण सध्या कोरोनाची भिती लोकांच्या मनांत इतकी जास्त आहे की त्यांना तुम्ही जे सांगाल ते करतील!
मित्रहो आयुर्वेदात गरम पाण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे, प्रत्येक आजारी व्यक्तिने गरम पाणीच प्यायला हवे. पण आयुर्वेदाने देश, काल इ. परिमाणांचा विचार करुन सिध्दांत अंमलात आणायला सांगितले आहे. या उन्हाळ्याच्या दिवसांत जर गरम गरम पाणी प्यायले तर नक्कीच हानीकारक ठरेल! मग हा उपाय चुकीचा आहे का? नक्कीच नाही. कोरोना सारख्या विषाणुजन्य आजारात ( ज्याला आयुर्वेदाच्या भाषेत भूतोपसर्गजन्य सान्निपातिक ज्वर म्हणतात) गरम पाणी पिण्याची एक विशिष्ट पध्दत आहे ज्याला शृतशीत असे म्हणतात ! शृतशीत म्हणजे उकळून गार केलेले पाणी !
ह्यात पाणी उकळ्याचा उद्देश पाण्यातील किटाणू – विषाणू मारुन पाणी निर्जंतुक करणे हा नसून पाण्यावर अग्नि संस्कार करुन त्यात रोगाचा नाश करण्याचे सामर्थ्य निर्माण करणे हे आहे. साधे पाणी हे अपक्व जल असे मानले जाते, पाणी देखील शरीरात गेल्यावर त्याचे पचन होणे आवश्यक असते. कोणत्याही आजारात विशेषतः ताप असतांना तर साधे पाणी / थंड पाणी पिणे पूर्णतः निषिध्द आहे. पाणी निर्जंतूक करणे हा उद्देश ठेऊन अनेक फिल्टर्स बाजारात उपलब्ध आहेत त्यामुळे अनेक जण म्हणतात की अहो आमच्या कडे आधुनिक UV Filter व modern असा water filter आहे, मग मी कशाला पाणी उकळत बसु ? त्यांना माझे हे सांगणे आहे की आयुर्वेदाचा मुळी किटाणू मारणे ह्या संकल्पनेवर विश्वासच नाही ! पाणी स्वच्छ असायलाच हवे त्या बद्दल दुमत नाहीच. पण शतप्रतिशत किटाणू मारणे शक्य नाही ! आपल्या भोवती करोडो किटाणू असतात, त्या सगळ्यांना मारत बसलो तर खूप वेळ व उर्जा लागेल, आणि ते शक्य ही नाही. त्यापेक्षा किटाणूं विरुध्द लढणे जास्त चांगले व त्यासाठी शरीराच्या रोग प्रतिकार शक्तिला सक्षम करणे ही आयुर्वेदाची भूमिका आहे.

प्रत्येक ऋतुनुसार पाणी किती उकळावे ह्याचे शास्त्र आहे, आपण एवढ्या खोलात न जाता पाण्याला उकळी फुटे पर्यंत गरम करावे व ते आपोआप म्हणजे नैसर्गिकपणे थंड झाल्यावर वापरणे ह्यास शृतशीत असे म्हणतात, एवढे केले तरी पुरे एक लिटर पाण्याचे आटवून पाव लिटर करणे ह्यास आरोग्याम्बु असे म्हणतात, अम्बु म्हणजे पाणी आरोग्याम्बु म्हणजे आरोग्य देणारे पाणी ! असे करणे आदर्श ठरेल, पण निदान उकळी येईपर्यंत तरी गरम करायला हवे व ते नैसर्गिक उपायांनी थंड होऊ द्यावे. असे पाणी हे आयुर्वेदाच्या दृष्टीने त्रिदोष शामक म्हणजे वात, पित्त व कफ ह्या तिन्ही दोषांचा प्रकोप झाला असता त्या तिन्ही दोषांना नियमित करण्यास उपयुक्त ठरते. मागे सांगितल्या प्रमाणे कोरोना सारख्या विषाणूंना हे असे गरम पाणी मारते का, माहित नाही पण अशा कोणत्याही विषाणू किंवा किटाणूंचा शरीरात प्रवेश होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ देत नाही आणि असे विषाणू किंवा किटाणू शरीरात प्रविष्ट झाले तरी त्यांच्या पासून शरीरातील पेशींचे रक्षण हे शृतशीत जल करते. सर्दी-पडसे झाले असेल, खोकला येत असेल, दम लागत असेल तर उकळून कोमट – कोमट पाणी प्यावे. अन्यथा इतरांनी उकळून गार केलेले पाणी प्यावे.