काळजी घेणे हाच उपाय

सहा सात महिने झाले आपण सगळे कोविड 19 या विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी लॉक डाऊन मध्ये आहोत. मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अजूनही खूप निर्बंध आहेत.सुरुवातीला अगदी कडक असणारे नियम कालांतराने हळूहळू शिथिल करण्यात आले कारण अशी स्थिती कायम राहू शकत नाही. घराबाहेर पडायचं नाही असं कायम होऊ शकत नाही. आणि म्हणूनच वेगवेगळ्या फेजेस मध्ये अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत.

याचा परिणाम म्हणून लोकं मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडू लागले आहेत .अनेक ठिकाणी तर नेहमीप्रमाणे गर्दी दिसून येते आहे, विशेषतः आता दसरा, दिवाळी हे मोठे वार्षिक सण येतायत, लोकं खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग लोकांच्या एकमेकांशी संपर्कात येण्यामुळे, स्पर्शामुळे, गर्दीमुळे किती मोठा आहे हे माहीत असताना अशी गर्दी होणं खूपच रिस्की आहे.

अनेक लोकं त्यांना या धोक्याची जाणीव नसल्याने किंवा बेदरकारपणे सगळं डावलून वेड्यासारखे वागत आहेत. मास्क न लावणे, एकमेकांशी हात मिळवणे, सोशल डिस्टनसींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी शिंकताना, खोकताना काळजी न घेणे इ.

अनेक जण काही त्रास होत असला तरी तो लपवत आहेत की नको,कोविड टेस्ट करावी लागेल आणि ती पॉझिटिव्ह आली तर मग त्रास किती प्रमाणात आहे त्यानुसार क्वारंटाईन होणं किंवा ऍडमिट होणं हे सगळं नकोच ! किरकोळ त्रास असेल तर हे लोकं खुशाल बाहेर फिरतात, लोकांत मिसळतात आणि अनेकांना संसर्ग देत राहतात,पसरवत राहतात.

सर्वसामान्य नागरिकांकडे यापैकी कोणतीही गोष्ट टाळण्यासाठी काहीही उपाय किंवा अधिकार नाही त्यामुळे आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं इतकंच आपल्या हातात आहे. कारण अजून काही महिने तरी कोरोना साठी कोणतीही लस उपलब्ध होणार नाही आणि आल्यावर ती लगेच सगळ्यांपर्यंत पोचणार नाही .ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्या कडे एकच उपाय शिल्लक राहतो आणि तो म्हणजे आपली प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवणं.

काय कराल?

 • रोज पिण्यासाठी कोमट पाणी वापरावे.
 • बाहेर जाऊन आल्यावर किंवा रोज कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या लोकांनी गरम पाणी किंवा त्यात निलगिरी तेलाचे चार थेंब टाकून वाफ तर घ्यावीच पण गरम पाण्यात मीठ,हळद घालून गुळण्या कराव्या.
 • संध्याकाळी घरात सगळीकडे धूप फिरवावा.
 • तव्यावर लसणाची सालं, ओवा ,कडुनिंबाची वाळलेली पानं , पांढरी मोहरी यांची धुरी नाकाने घ्यावी.
 • ज्यांना डायबेटीस नाही अशा व्यक्ती सकाळी उपाशीपोटी एक चमचा च्यवनप्राश खाऊ शकतात.
 • शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता होऊ देऊ नये , त्यासाठी मात्र वैद्यकीय सल्ला घेऊनच औषधे इ. चा वापर करावा.
 • थंड व आंबट पदार्थांमुळे कफ किंवा सर्दी, खोकला होण्याची शक्यता दाट असते त्यामुळे दही, लिंबू, चिंच व फ्रिजमधील पदार्थ, गार पाणी, कोल्ड्रिंक्स ,आईस्क्रीम यांचा वापर करु नये.
 • रोज सूर्यनमस्कार, प्राणायाम यांचा सराव करावा.
 • श्वसनाचे व्यायाम, अनुलोम विलोम, यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते त्यामुळे ते अवश्य करावेत.
 • पुरेशी झोप, विश्रांती या गोष्टी देखील इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे वेळेवर आणि पुरेशी झोप घ्यावी.
 • खाण्याची काळजी घ्यावी, खूप तेलकट, मसालेदार ,गोड पदार्थ वारंवार न घेता पथ्यकर साधं, गरम व ताजे अन्न खावे.
 • जेवणात भाज्या , डाळी , कच्चे सॅलड्स , तूप यांचा समावेश नक्की करावा.
 • बाहेरून आणलेल्या वस्तू तसंच भाज्या, फळं सॅनिटाइझ केल्याशिवाय वापरु नयेत.
 • अत्यावश्यक असल्याखेरीज घराबाहेर पडू नये, विशेषतः वयस्कर लोकांनी तर नाहीच!
 • बाहेर पडताना तोंड आणि नाक पूर्ण झाकलं जाईल असा मास्क वापरायला हवा. तो पुन्हा घरी येईपर्यंत अजिबात काढू नये.
 • बाहेर जिथे वस्तू किंवा पैसे हाताळले जातील ,कोणत्याही सरफेस किंवा पृष्ठभाग यांच्याशी संपर्क येईल तेव्हा लगेच सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ करावे.
 • शक्य असेल तिथे साबण व पाणी वापरून हात धुवावेत.
 • लोकांशी कोणत्याही स्वरूपाचा संपर्क म्हणजे हात मिळवणे , गर्दीत लोकांशी चालताना धक्का लागणे, चिकटणे असे होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
 • बाहेरून घरी आल्यावर घरात कुठेही संपर्क न करता लगेच गरम पाण्याने आंघोळ करावी व कपडे गरम पाण्यात साबण घालून भिजवून ठेवावेत.
 • मास्क रोजच्या रोज धुतलेलाच वापरला पाहिजे.

या प्रकारे काळजी घेतल्यास आपण कोरोना पासून दूर राहू शकतो.

आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये आम्ही रुग्णांसाठी काही इम्युनिटी बुस्टिंग औषधे देत आहोत .

 • रोजच्या चहामध्ये काही वनौषधी वापरून केलेला सुगंधी मसाला यासाठी उपयुक्त ठरतो, असा उत्तम प्रतीचा मसाला हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.
 • धुरी घेणं सोपं व्हावं म्हणून एका विशेष धूमवर्तीचे निर्माण केलं आहे जी पेटवून नाक आणि घशाला धूर देणं सोपं होतं .
 • अत्यंत चांगल्या प्रतीचा अष्टवर्ग युक्त च्यवनप्राश हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे .

या सर्व उत्पादनांचा व औषधांचा लाभ आपण घेऊ शकता.

वैद्य राजश्री कुलकर्णी वैद्य अभय कुलकर्णी
M. D.( आयुर्वेद) M. D.( आयुर्वेद)